बातम्या

अखेर शिरढोण ग्रामपंचायतीची सहल रद्द..सहलीचा निधी शाळेला

Finally Shirdhon Gram Panchayat's trip is cancelled


By nisha patil - 1/13/2024 11:22:55 PM
Share This News:



 शिरढोण (संजय गायकवाड)  ग्रामपंचायतीने शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत एक आदर्शवत पाऊल उचलले.सरपंच बाबासाहेब  हेरवाडे यांनी    ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा सहल रद्द करत सुमारे दोन लाख रुपये निधीची रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संगणक खरेदीसाठी वापरले जाणारे असल्याचे जाहीर केले.या निर्णयामुळे गावातील होतकरू गरीब मुलांना शैक्षणिक दृष्टया लाभ होणार असल्याने ग्रामस्थांनी सरपंचाच्या  निर्णयाचे कौतुक केले आहे.
    

ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून काढलेल्या विकास पाहणी दौऱ्याचा गावाला  आजपर्यंत कोणताच फायदा झाला नाही. सरपंच बाबासाहेब हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच रेश्मा चौधरी,सदस्य सागर भंडारे,शक्ती पाटील,ग्रामसेवक डी. आर.कांबळे तलाठी रवि कांबळे यांच्या उपस्थितीत  शैक्षणिक दृष्ट्या स्तुत्य  निर्णय एकमताने घेण्यात आला. दरम्यान अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र  वेंगुर्ला,पाटोदा, हिवरे बाजार व बारामती या तीन ठिकाणी गेल्या तीन वर्षात सहल जाऊन आली. सहल जाऊन  आल्यानंतर ग्रामस्थांना या सहलीचा काहीच फायदा झाला नसल्याचे व ग्रामस्थांनी गावसभेत सहल रद्द करून सहलीचा निधी प्राथमिक शाळेला संगणक खरेदीसाठी देण्याची  मागणी केल्याने सरपंच हेरवाडे यांनी सहल रद्द करून याचा निधी शाळेला संगणक देण्यासाठी खर्च करणार असल्याचे जाहीर करून ग्रामस्थांना सुखद धक्का दिला

   यावेळी ग्रामस्थांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले याचे उत्तर देत राहिलेल्या त्रुटींचे लवकर निरसन करू असे सांगत विविध विषयांना उत्तरे दिली.दरम्यान काही प्रश्नावरून वाद निर्माण झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.विषय पत्रिकेवरील १४ विषयांचे वाचन ग्रामसेवकांनी केले.दरम्यान घेण्यात येत असलेली सभा रद्द की तहकूब झालेली घेण्यात आली यावर सामाजिक कार्यकर्ते शाहीर  बाणदार यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरले .यावेळी पंचगंगा नदी प्रदूषण या विषयावर विश्वास बालीघाटे यांनी  इचलकरंजी महानगर पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळावर कायदेशीर कारवाई करा असा ठराव करण्याची मागणी केली.

यावेळी सरपंचांनी ठराव करण्याचे मान्य केले .यावेळी सय्यद मुजावर,सुधाकर खोत, शशीकांत चौधरी, रवि कांबळे, सचिन यादव, रामदास सासणे,चंद्रकांत मालगावे आदी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अखेर शिरढोण ग्रामपंचायतीची सहल रद्द..सहलीचा निधी शाळेला