विशेष बातम्या
अखेर लाचखोर विनायक औंधकर निलंबित
By nisha patil - 10/6/2023 5:11:36 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम बांधकाम परवाना देण्यासाठी एका व्यावसायिकाकडून दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या विटा नगरपालिकेचा मुख्याधिकारी विनायक औंधकर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नगर विकास खात्याने ७ जून रोजी दिले आहेत. बांधकाम परवाना देण्यासाठी औंधकर यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे अडीच लाखांची मागणी केली होती. तडजोड्यांची दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबतची तक्रार संबंधित बांधकाम व्यावसायिकाने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. औंधकर यांच्या कार्यालयातच दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगीहात ताब्यात घेतलं होतं .आता यानंतर नगर विकास खात्याने अंतर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे विटा शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे पुन्हा एकदा स्वागत केले.
अखेर लाचखोर विनायक औंधकर निलंबित
|