राजकीय

अखेर "राजाराम साखर कारखाना "अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला

Finally it was time for the election ofRajaram Sugar Factory President


By surekha -
Share This News:



अखेर "राजाराम साखर कारखाना "अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला

 नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक 9 मे रोजी होत आहे. निवडणूक पार पडल्यानंतर संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कारखान्याची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव चर्चेत  असले, तरी महादेवराव महाडिकांचे आजवरचे धक्कातंत्र पाहता म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा आहे. नव्या संचालक मंडळामध्ये 14 नवीन चेहरे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी दिलीप पाटील तसेच शिवाजी पाटीलही नावे चर्चेत येऊ शकतात. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 9 मे रोजी सकाळी दहा वाजता करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक होईल. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार? हे निश्चित केलं जाईल.


Finally it was time for the election of Rajaram Sugar Factory" President