बातम्या
अखेर उत्तर प्रदेशमधील खासगी शाळा उदया का बंद
By nisha patil - 8/8/2023 6:49:00 PM
Share This News:
अखेर उत्तर प्रदेशमधील खासगी शाळा उदया का बंद
उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील चिल्ड्रन गर्ल्स स्कूलमधील 11वीच्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकावर मुलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. घडलेल्या घटनेनंतर मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकाला अटक केल्याने खासगी शाळाचालक संतप्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच, 8 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील सर्व खाजगी शाळा बंद राहणार आहेत.
यूपीतील खासगी शाळांमध्ये सर्व बोर्डाच्या शाळांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील सर्व खाजगी शाळा संघटनांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलै रोजी आझमगडमधील 11 वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली, मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्या खासगी शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकाला अटक करण्यात आली होती.
यूपीच्या आझमगडमधील कोलघाट शहरातील 11वीची विद्यार्थिनी चिल्ड्रन गर्ल्स स्कूलमध्ये शिकत होती. 31 जुलै रोजी तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलीच्या घरातल्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकावर मुलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकाला अटक केली. तपासात पोलिसांना विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून एक ऑडिओही मिळाला आहे. ऑडिओमध्ये मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा मानसिक छळ करताना दिसत आहेत. विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिप ऐकून मुख्याध्यापक तिचा मानसिक छळ करत असल्याचं समोर आल्याचं म्हटलं जात आहे.
अखेर उत्तर प्रदेशमधील खासगी शाळा उदया का बंद
|