बातम्या

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला

Finance Minister Abdul Sattar was condemned


By nisha patil - 3/14/2024 9:34:45 PM
Share This News:



पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील  वाहतूकदार संघटना उपस्थित होते

कोल्हापूर : प्रतिनिधी कराड तालुका माल ट्रक वाहतूकदार संघटना व कराड गुड्स ट्रान्सपोर्ट अँड मोटर ओनर्स असोशियन कराड जिल्हा सातार्याच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटना प्रतिनिधी व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या विचाराने   पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले शिरोली शिरोळ सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड, महाड पेठनाका, विदर्भ, मराठवाडा वाहतूकदार संघटनाप्रतिनिधी यांचे उपस्थितीत निर्धार मेळाव्याचे आयोजन कराड येथे करण्यात आले होते 
  सदरच्या निर्धार मेळाव्यात पुढील निर्धार करण्यात आले 
 १) ज्याचा माल त्याचा हमाल 
२) ज्याचा माल त्याचा विमा 
३) खर्चावर आधारित दीडपट भाडे 
४) महाराष्ट्रातील आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट बंद झाले पाहिजे
५) व्यापारी, ट्रान्सपोर्ट यांनी व्हाट्सअप वर मालाचे भाडे भरणे उतरणे हमाली सह(लोडिंग अनलोडिंग) टाकलेस त्यांना कोणीही गाडी द्यायची नाही

 

 याबाबतीत सर्व संघटनांनी एकमताने दिनांक २०/०३/२०२४ पासून सापी भाड्यामध्ये गाड्या भरायचे आहेत या नियमाचे ट्रान्सपोर्ट वाला किंवा ट्रक मालक वरील नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करून बहिष्कार घालण्यात येणार आहे तरी याची पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ट्रान्सपोर्ट बांधवांनी व ट्रकमालक व चालक यांनी नोंद घ्यावी
   

यावेळी वाराई वाहनधारकाने देणे लागत नाही याबाबत पणन संचालक डॉ .केदारी जाधव यांनी काढलेल्या परिपत्रकाला स्टे देणाऱ्या पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला व त्यांनी काढलेल्या स्टेच्या पत्राची  होळी करून त्यांच्या नावाने बोंब मारण्यात आली
 कराड येथील माल ट्रक  वाहतूकदारांचा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माल ट्रक वाहतूकदारांचे खंबीर नेते तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष बापू जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले 
 यावेळी सातारा प्रवासी व मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस चे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, कराड गुड्स ट्रान्सपोर्ट अँड मोटर ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अल्ताफ सवार, मन्सूर बागवान, राहुल पुजारी, मन्सूर मोदी,कराड तालुका माल ट्रक वाहतूकदार संघटनेचे खंबीर अध्यक्ष प्रदीप शेवाळे पैलवान , संतोष पाटील प्रीतम हत्तीकर मुद्दतसर मोमीन सचिन संकपाळ , फिरोज मुल्लानी ,हसन पटेल, जीवन शेवाळे, लक्ष्मण गडदे कोल्हापूर डिस्टिक लॉरी ऑपरेटर असोसिएशन चे उपाध्यक्ष भाऊ घोगले ,सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर संचालक विजय भोसले गोविंद पाटील उत्तम पसारे सतीश धनाल सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, महेश पाटील, जयंत सावंत, एकता स्वाभिमान संघटना सांगलीचे अध्यक्ष शंकरराव चिंचकर,पुना ट्रक वाहतूक संघटनेचे चंद्रकांत हरपले, शशिकांत डोंबे, पुना गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र राजपूत ,सिंधुदुर्ग चे शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर , स्वाभिमान संघटना कोल्हापूरचे अध्यक्ष युवराज माने, कनेरकर , स्वाभिमान संघटना वाठारचे अध्यक्ष प्रशांत बोधले ,रणजीत माजगावकर, शिरोली नागाव ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी इचलकरंजी गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अशोक शिंदे,बीड मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे , कुर्डूवाडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दत्ता काकडे, खेड आणि चिपळूणचे बुवा सावंत  आदी ट्रान्सपोर्टर्स, ट्रक धारक उपस्थित होते.


पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला