बातम्या

कचरावेचक महिला बचत गटांची आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न.

Financial Literacy Workshop of Women Self


By nisha patil - 7/23/2023 3:12:44 PM
Share This News:



अवनि संस्था ही गेली 9 वर्षे कोल्हापुर जिल्हयातील कचरावेचक महिलांचे संघटन केले आहे.,सध्या जिल्हयातील कचरावेचकांच्या विकासासाठी अवनि संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. कचरावेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच  संस्थेच्या मार्गदर्शनातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 45 कचरा वेचक महिलांचे बचत गट असून त्या माध्मातून त्यांना आर्थिक सक्षमीकरण बनवलं जातं.  तसेच त्यांना व्यवसाय बद्दलचे मार्गदर्शन केले जाते.आरोग्य सुविधा शिवाय सामाजिक सुरक्षा योजना कचरावेचकांसाठी अवनि संस्थेमार्फत केले जाते. वडणगे येथे  कचरावेचक महिला बचत गटांचे आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन मा.संगिता पाटील (सरपंच ) वडणगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक माया जोगडे यांनी केले. कार्यशाळेचे मार्गदर्शन ऋषिकेश गावडे (मॅ़नेजर)  बॅंक ऑफ इंडिया शाखा आंबेवाडी यांनी केले. या मध्ये प्रामुख्यानं महिला बचत गटांनी बॅंकेचा आर्थिक व्यवहार,बचत गट मधील फसवणूकीचे प्रकार घडू नयेत. महिला बचत गटामधून व्यवसाय लोन बाबत अधिक माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता
पैसे आणि कर्जाचे प्रभावी व्यवस्थापन आर्थिक ध्येय कसे प्राप्त करावे याची चांगली समज असणे. सुधारित नियंत्रणाद्वारे खर्च कपात आर्थिक चिंता आणि तणाव कमी कसे झाले आहेत.तसेच विमा, कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड वापरताना नैतिक निर्णय घेण्यात कसे घ्यावेत. प्रभावी निर्मिती व आर्थिक घटक आणि कौशल्यांची रचना कशी केली जाते. जी व्यक्तीला पैसे आणि कर्ज प्रभावीपणे कसे हाताळावे हे जाणून घेण्यास सक्षम बनविणे या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कुलभूषण उपाध्ये, डायरेक्टर, आरसेटी, सुधीर हार्डीकर 
सूत्रसंचालन पूनम माळी यांनी केले. आभार जैनुद्दीन पन्हाळकर  प्रकल्प समन्वयक यांनी मांडले. या कार्यशाळेला आक्काताई गोसावी,साताप्पा मोहिते उपस्थित होते. तसेच या कार्यशाळे करिता 45 कचरा वेचक महिला उपस्थित होत्या. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आक्कताई गोसावी,सविता गोसावी, रेशमा डोहरे, कल्पना गोसावी,माया गोसावी, सुवर्णा गोसावी यांनी परिश्रम घेतले.


कचरावेचक महिला बचत गटांची आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न.