बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताचे प्रमुख कारण आग

Fire is the main cause of the fatal accident on Samriddhi Highway


By nisha patil - 5/7/2023 4:44:34 PM
Share This News:



समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताचे प्रमुख कारण आग

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खाजगी बसला भीषण आग लागली होती या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बसला  लागलेली आग हेच बसच्याअपघाताचे  प्रमुख कारण असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे.

मुंबई फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या संस्थेने बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून या अहवालात आग हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले मुंबईच्या फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर या खाजगी संस्थेला या अपघाताची चौकशी आणि तपास करण्याचे काम देण्यात आलं होतं अपघाताचा तपास करून या संस्थेने फॉरेनसिक अहवाल तयार केला हा अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलाय


समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताचे प्रमुख कारण आग