बातम्या
तिन्ही दलातील अग्निवीर महिला प्रथमच कर्तव्यपथावर
By nisha patil - 1/26/2024 12:02:18 PM
Share This News:
तिन्ही दलातील अग्निवीर महिला प्रथमच कर्तव्यपथावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्त्वाखाली आज २६ जानेवारी २०२४ रोजी कर्तव्यपथावर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. दरम्यान १०० महिला कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीत वाजवत पथसंचलनाची सुरुवात केली.यावेळी भारतीय भूदल, नौदल आणि वायूदलातील अग्नीवीर महिलांच्या तुकडीने देखील प्रथमच संचलनात सहभाग दर्शवला.
आज भारतीय प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर तिनही दलातील नियमित सेवेत भरती झालेल्या अग्निवीर महिला तुकडीने प्रथमच संचलनात सहभाग घेतला. सर्व त्रि-सेवेतील महिला सैनिकांची तुकडी कार्तव्य पथावर कूच करण्याची ही पहिलीच वेळ आहे.राष्ट्रपती मुर्मू यांनी फडकावला तिरंगा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर राष्ट्रगीत आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर परेडची सुरुवात झाली. दरम्यान फ्रेंच सेनेने देखील कर्तव्यपथावर संचलन केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांना आज वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. येथे त्यांनी २ मिनिटे मौन बाळगले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही यावेळी उपस्थित आहेत.
कर्तव्यपथावर नारी शक्तीचे दर्शन
यावेळी प्रथमच तीनही सैन्यदल, निमलष्करी गट आणि पोलीस दलाचे नेतृत्व महिला करत आहेत. तिन्ही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व भारतीय लष्कराचे कॅप्टन शरण्य राव करत आहेत. केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकडीत महिला कर्मचारीही सहभागी झाल्या आहेत. BSF, CRPF आणि SSB च्या महिला कर्मचारी 350CC रॉयल एनफिल्ड बुलेटवर स्वार होऊन साहसाचे दर्शन घडवणार आहेत. तर कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन होत आहेत
तिन्ही दलातील अग्निवीर महिला प्रथमच कर्तव्यपथावर
|