बातम्या
मतदान संपताच वारजेत हवेत गोळीबार
By nisha patil - 8/5/2024 5:48:27 PM
Share This News:
पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे.
भररस्त्यात अनेक ठिकाणी गोळीबाराचे प्रकरणं समोर आले आहेत. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.
आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हवेत केलेल्या गोळीबाराने काही वेळ परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांमध्ये खळबळ उडाली होती.
वारजे माळवाडी येथील रामनगर भागात एक दोन नाही तर तिघे जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. साधारण रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. पुण्यातील वारजे हा परिसरात बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सगळं मतदान सुरळीत पार पडल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मतदान संपताच वारजेत हवेत गोळीबार
|