बातम्या

शाळेच्या पहिला दिवस कोल्हापुरात मनपा शाळेनं केला यादगार; शाळेतील पहिल्या पावलांचे घेतले ठसे

First day of school in Kolhapur was made memorable by municipal school First steps taken in school


By nisha patil - 6/15/2023 6:39:49 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात लेकरांचा पहिल्या चिरंतन स्मरणीय करण्यासाठी पालकांसह अनेक शाळांमध्ये शिक्षकांकडूनही जोरदार आदरातिथ्य करण्यात आले. कोल्हापुरात अनेक शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीने मुलांचे स्वागत करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यामध्ये विशेष करून शाळेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करत असलेल्या मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. तसेच काहींचा चेहरा पडलेलाही दिसून आला.आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पोहोचवण्यासाठी पालकही सोबत गेले आहेत. कोल्हापूरमधील मनपा शाळांची गुणवत्ता नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी या शाळा प्रसिद्ध आहे. जरग नगरमधील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या मनपा शाळेची ख्याती अवघ्या कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्येही आहे. याच मनपा शाळेत गुढीपाडव्याचा मुहूर्तावर शालेय प्रवेश कोणत्याही वशिल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जातो. त्यामुळे पाडव्याच्या आदल्या दिवसापासून या शाळेत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी रांग लागते. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.


शाळेच्या पहिला दिवस कोल्हापुरात मनपा शाळेनं केला यादगार; शाळेतील पहिल्या पावलांचे घेतले ठसे