बातम्या
मतदानासाठी नियुक्त मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिल्या दिवसातील प्रशिक्षण संपन्न
By nisha patil - 11/13/2024 6:57:47 PM
Share This News:
मतदानासाठी नियुक्त मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिल्या दिवसातील प्रशिक्षण संपन्न
• आज व उद्या 16 हजार 237 प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार प्रशिक्षण
: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असुन यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 16 हजार 237 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज 9 व उद्या 10 नोव्हेंबर या दोन दिवशी त्या त्या मतदारसंघात वर्ग प्रशिक्षण व विशेष हाताळणी प्रशिक्षण 2 टप्प्यात होणार असून आज झालेल्या प्रशिक्षणातील दोन्ही सत्रात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तर त्या त्या निवडणुक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना पीपीटीव्दारे सविस्तर मार्गदर्शन केले.
विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी याकामात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या.
या प्रशिक्षण सत्रात मतदान अधिकारी यांना टपाली मतदान, निवडणूक कार्य प्रमाणपत्र, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे कर्तव्य, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूकीतील महत्वाचे बदल, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण तपासणी, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र (EVM), तपासणी, मतदान यंत्रांची (BU) तपासणी, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्व तयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्राबाबत, मतदान केंद्रावर आंतरजालावरुन प्रक्षेपणाचा वापर (वेबकॉस्टिंग), दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, अंध, अपंग मतदारांकडून मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख व जोडणी प्रक्रिया, मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी (VVPAT), अभिरुप मतदान (मॉकपोल) चिठ्या सिल करणे, मतदार यंत्र मोहोरबंद करणे, याचबरोबर निवडणूकीच्या कार्यपध्दतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त मतदान केंद्र अधिकारी- कर्मचारी आकडेवारी पुढीलप्रमाणे –
271- चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 780 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 395 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 385 आहेत.
272- राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 950 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 468 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 482 आहेत.
273- कागल विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 661 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 586 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 075 आहेत.
274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 690 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 475 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 215 आहेत.
275- करवीर विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 659 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 434 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 225 आहेत.
276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 474 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 045 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 429 आहेत.
277- शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 586 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 477 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 109 आहेत.
278-हातकणगंले विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 595 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 575 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 020 आहेत.
279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 351 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 460 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 891 आहेत.
280- शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 491 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 548 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 943 आहेत.
या प्रकारे 10 विधानसभा मतदार संघात पुरुष 10 हजार 862 तर महिला 5 हजार 375 असे एकूण 16 हजार 237 अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानासाठी नियुक्त मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिल्या दिवसातील प्रशिक्षण संपन्न
|