विशेष बातम्या

'बिग बॉस ओटीटी 2' च्या घराची पहिली झलक; सोशल मीडियावर

First glimpse of Bigg Boss OTT 2 house on social media


By nisha patil - 6/14/2023 9:21:58 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  प्रेक्षक बिग बॉस ओटीटी-2 ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमान खान पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटी शो होस्ट करणार आहे. सध्या  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये बिग बॉस ओटीटी-2 च्या घराची झलक दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 2 च्या घराच्या आतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर असा अंदाज लवला जाऊ शकतो की, बिग बॉस ओटीटी 2 च्या घराची थीम खूपच इंटरेस्टिंग आणि सुंदर असणार आहे. जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया अकाऊंवरुन बिग बॉस ओटीटी 2 च्या घराची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे.  त्या फोटोला कॅप्शन देण्यात आलं. 'स्पर्धकांच्या झलकने तुमचे मन जिंकले असेल, यावेळी जनताच खरी बॉस असणार आहे, त्यामुळे पब्लिक डिमांड असल्यामुळे आम्ही ही घराची पहिली झलक दाखवत आहोत'
जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये बिग बॉस ओटीटी-2 च्या घरामधील एक कॉर्नर हा किचनमधील वस्तूंचा वापर करुन सजवण्यात आला आहे, असं दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये बिग बॉसचा डोळा देखील दिसत आहे.


'बिग बॉस ओटीटी 2' च्या घराची पहिली झलक; सोशल मीडियावर