बातम्या
रोटरॅक्ट क्लब ऑफ विवेकानंद कॉलेजचा पहिला पदग्रहण सोहळा संपन्न
By nisha patil - 2/27/2024 4:08:50 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 27 रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत, रोटरॅक्ट क्लब ऑफ विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. (अधिकारप्रदत्त स्वायत्त), चा पहिला पदग्रहण सोहळा दिनांक २७/०२/२०२४ ग्रंथालय हॉल मध्ये संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० गव्हर्नर नासिर बोरसदवाला म्हणाले की “रोटरॅक्ट हा एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म असून आपल्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात येणाऱ्या कॉर्पोरेट जगतासाठी याचा सदुपयोग करुन घ्यावा” या सोबत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी न्यू एजुकेशन पॉलिसी चा उद्देश आणि रोट्रॅक्ट चा उद्देश यातील साम्य सांगितले तसेच विद्यार्थांची वैचारिक देवाण घेवाण नेतृत्व गुण, व्यवसायिक क्षमता वाढविण्याकरिता रोटरॅक्ट या मंच चा कसा उपयोग होऊ शकतो यावर मार्गदर्शन केले.
कोल्हापूर झोन हेड अभिजित पाटील यांनी रोटरॅक्ट मधून परदेशातील शिक्षणाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले, या प्रसंगी नुतन अध्यक्षपदी रोहित पाटील, सचिवपदी वैष्णवी राजपूत , खजानीसपदी प्रवीण जामखंडी व संचालक पदी सर्व विभागातील विद्यार्थांची निवड करण्यात आली.
या सर्व निवडीकरिता IQAC समन्वयक डॉ. श्रृती जोशी, B.B.A समन्वयक डॉ. रेवती पाटील यांची मोलाची मदत झाली . या कार्यक्रम प्रसंगी रोटेरियन दादासाहेब कोडोलकर, रोटेरियन मानसिंग पानसकर, रोटेरियन वारणा वडगावकर, रोटेरियन उदय दिक्षित. कॉलेज चे विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रोटरॅक्ट क्लब ऑफ विवेकानंद कॉलेजचा पहिला पदग्रहण सोहळा संपन्न
|