बातम्या

मराठवड्यात उष्माघाताचा पहिला बळी

First victim of heat stroke in Marathwada


By nisha patil - 1/4/2024 4:11:20 PM
Share This News:



 राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.  उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. एकीकडे आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मराठवाड्यात  पैठण तालुक्यातील बिडकिन येथे 30 वर्षीय युवकाचा रविवारी उष्माघाताने  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मराठवाडा पैठण तालुक्यातील हा पहिला बळी असल्याची चर्चा सुरू आहे.जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजेदरम्यान घडली आहे. गणेश राधेश्याम कुलकर्णी  असे मयताचे नाव आहे. गणेश हा मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेला असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडला होता. त्यानंतर त्याच्या नाक, तोंडातुन फेस येऊन जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे नातेवाईक शुभम कुलकर्णी याने उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता मात्रे यांनी गणेश कुलकर्णी यास मयत घोषीत केले आहे.ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गणेश कुलकर्णी हा एका खासगी कंपनीत मजुर म्हणून काम करत होता.त्याच्या पश्चात पत्नी,14 महिन्याचा मुलगा,आई व वडील असा परिवार आहे. बिडकिन आणि परिसरात घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.


मराठवड्यात उष्माघाताचा पहिला बळी