विशेष बातम्या
फिटनेस : सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते
By nisha patil - 5/27/2023 7:02:10 AM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम :पुष्कळ लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते. काहींना दुपारी तर काहींना केव्हाही येते. अशा वेळी बासमती जुना तांदूळ एक मूठभर घेऊन तो साजूक तुपावर (एक चमचा) भाजून घेऊन न धुता त्याची पेज करावी. ती चांगली घुसळून एकजीव झाल्यावर चवीला मीठ टाकून एक ग्लासभर तयार करावी. सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर अनोशापोटी ती पेज घ्यावी. नंतर एक तासाने काही खायचे असल्यास खावे.
हा बासमती तांदूळ साठविताना त्यात बोरीक पावडर घालू नये, कारण न धुता पेज करायची असते. म्हणून तांदूळ साठवताना कडुनिंबाचा पाला टाकल्यास उत्तम. जुना तांदूळ जास्त परिणामकारक असतो.
उन्हातून जाऊन आल्यावर चक्कर येते. अशा वेळी एक कप पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते मिश्रण प्यावे.
आवळे आणून ते स्वच्छ धुवून ते बारीक काडीने टोचावेत. नंतर ते मिठात टाकून बरणीत भरून ठेवावेत. मुरलेले आवळे चक्कर आल्यावर त्यातील मोठा आवळा असल्यास अर्धा व लहान असल्यास एक खावा.
ओवा भाजून थोडे लोणकढे घालून व किंचित सैंधव घालून त्याची पावडर करावी. अर्धा चमचा साजूक तूप + एक चमचा मध + एक चमचा ओवा पावडर यांचे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे.
आवळ्याचा मोरावळा दिवसातून तीन वेळा घ्यावा.
लिंबाचे सरबत ग्लासभर तीन वेळा घ्यावे.
माक्याच्या पानांचा रस काढून तो दोन चमचे, असे तीन वेळा घ्यावा.
पाच-सहा आमसुले ग्लासभर पाण्यात भिजत घालावीत. सकाळी हे पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे मीठ + जिरे + साखर घालून हे मिश्रण प्यावे.
फिटनेस : सकाळी उठल्याबरोबर चक्कर येतेspeednewslive24#
|