बातम्या
बनावट अकाउंट वरून प्रेमाची भुरळ घालणाऱ्यांना एक महिलेसह पाचजण ताब्यात
By nisha patil - 7/18/2023 7:03:32 PM
Share This News:
बनावट अकाउंट वरून प्रेमाची भुरळ घालणाऱ्यांना एक महिलेसह पाचजण ताब्यात
बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून प्रेमाची भुरळ घालून, चोरी करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतल आहे. चोरून नेलेल्या माला सह एक लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोमल कृष्णात पाटील, इंद्रजित पाटील, नितीन पांडुरंग पाटील, कोपर्डे, मोहसीन चांद साब मुल्ला,करण शरद रेणुसे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादी किरण उत्तम पाटील यांची instagram ॲप वरून शुभांगी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. शुभांगीने वडिंगे पाडळी येथील आविष्कार हायस्कूल येथे भेटण्यासाठी बोलवले. किरण हे त्या मुलालीला भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गाडीवरून त्या ठिकाणी तीन लोक आले आमच्या बहिणीला मेसेज का करतो असे म्हणून शिवीगाळ करून त्यात तिघांनी किरण पाटील यांच्याबरोबर झटापट करून त्यांच्याकडून मोबाईलवर रोख रक्कम काढून घेऊन पसार झाले.यानंतर पाटील यांनी याबाबत करवीर पोलीस ठाण्यात फिरयाद दिली. दरम्यान इंद्रजीत पाटील याने शुभांगी नावाने सुरू केलेले इंस्टाग्राम या फेक अकाउंट वरून किरण पाटील याच्याबरोबर चॅटिंग सुरू केली आणि मैत्री वाढवली. ही माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लाख 12 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
बनावट अकाउंट वरून प्रेमाची भुरळ घालणाऱ्यांना एक महिलेसह पाचजण ताब्यात
|