बातम्या

भयानक आगीने जयसिंगपुरात पाच ते सहा दुकाने जळून खाक

Five to six shops were gutted in Jaisinghpur in a terrible fire


By nisha patil - 1/30/2024 5:24:22 PM
Share This News:



शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील अकराव्या गल्लीतील डॉ. प्रवीण धनवडे यांच्या मिळकतीला सोमवारी रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी असलेल्या बाबुराव धनवडे पतसंस्थेसह पाच ते सात व्यापाऱ्यांची दुकाने या आगीत जळून खाक झाली. मंगळवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अकराव्या गल्लीतील नागरिकांना आग लागल्याचे लक्षात आले. अकराव्या गल्लीत असलेल्या हनुमान मंदिरा लगत आणि दत्त मंदिरासमोर धनवडे यांची मिळकत आहे. रात्री उशिरा आग लागल्यानंतर काच फुटण्याच्या आवाजामुळे दत्त मंदिर परिसरात रहिवासी भगवंत जांभळे यांनी घराबाहेर येऊन पहिले असता आग लागल्याचे निदर्शनास आले. यानंतर दत्त साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, कुरुंदवाड नगरपालिका यांचे अग्निशमन दल रात्रीपासून मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री आगीचे लोटच्या लोट पहिल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.
 

शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील अकराव्या गल्लीतील डॉ. प्रवीण धनवडे यांच्या मिळकतीला सोमवारी रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी असलेल्या बाबुराव धनवडे पतसंस्थेसह पाच ते सात व्यापाऱ्यांची दुकाने या आगीत जळून खाक झाली. मंगळवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अकराव्या गल्लीतील नागरिकांना आग लागल्याचे लक्षात आले. अकराव्या गल्लीत असलेल्या हनुमान मंदिरा लगत आणि दत्त मंदिरासमोर धनवडे यांची मिळकत आहे. रात्री उशिरा आग लागल्यानंतर काच फुटण्याच्या आवाजामुळे दत्त मंदिर परिसरात रहिवासी भगवंत जांभळे यांनी घराबाहेर येऊन पहिले असता आग लागल्याचे निदर्शनास आले. यानंतर दत्त साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, कुरुंदवाड नगरपालिका यांचे अग्निशमन दल रात्रीपासून मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री आगीचे लोटच्या लोट पहिल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.

आगीत कपड्यांचे दुकान, शालेय साहित्याचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान, धनवडे पतसंस्था, एका टेलर्सचे दुकान अशी अनेक दुकाने व त्यातील साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी सकाळपासून बघ्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे जयसिंगपूर-शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक नियंत्रकांनी पूर्व पश्चिम दिशेला वाहतूक वळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेची नोंद करण्याचे काम जयसिंगपूर पोलिसात उशिरापर्यंत सुरू होते.


भयानक आगीने जयसिंगपुरात पाच ते सहा दुकाने जळून खाक