विशेष बातम्या
विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी पाच वर्षांचा अर्थसंकल्प: अजित पवार
By nisha patil - 3/18/2025 5:54:28 PM
Share This News:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दुरुस्तीची गरज: अजित पवार
विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी पाच वर्षांचा अर्थसंकल्प: अजित पवार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले. निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील, मात्र या योजनेचा लाभ गरीब घटकांतील महिलांसाठीच असावा, असे ते म्हणाले. काही आर्थिक दृष्ट्या सक्षम महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही, पण यामध्ये दुरुस्ती करावी लागेल."
सोबतच, राज्याचा आगामी अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी राज्याच्या विकासावर जोर दिला. "विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा समग्र विकास डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार केला आहे," असे ते म्हणाले. विधानसभेतील सर्वसाधारण चर्चेत ७५ आमदारांनी सहभाग घेतला, त्यानंतर अर्थसंकल्पावर पवार यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षाच्या आरोपांचा समाचार घेत असताना, अजित पवार यांनी कविता, शेरोशायरी आणि राजकीय टोलेबाजीचा वापर केला.
विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी पाच वर्षांचा अर्थसंकल्प: अजित पवार
|