बातम्या
सोने - चांदीत चढउतार...
By nisha patil - 4/11/2023 8:27:23 PM
Share This News:
अलीकडे आपल्याला नेहमीच सणाचे औचित्य साधून सोने चांदी मध्ये चढ- उतार झाल्याचे आढळून येते. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन दिवसांत आणि नोव्हेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुरुवारी भावात वाढ झाली. त्यानंतर भाव पुन्हा उतरले.ऑक्टोबरच्या शेवटी दोन्ही धातूत घसरण झाली.
अमेरिकन केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजनांचा धोशा लावला आहे. पण यावेळी फेड व्याजदर वाढवणार नाही, असा काही अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे झाल्यास सोने-चांदीत मोठी उसळी टळेल. सध्या इस्त्राईल-हमासच्या युद्ध लांबल्यास दोन्ही धातूच्या किंमतीवर परिणाम होईल. मागील तीन दिवसांत सोने-चांदीत घसरण झाली. गुरुवारी भाव किंचित वाढले. आता पुन्हा किंमती कमी झाल्या आहेत. ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस आणि नोव्हेंबर महिन्याची सुरुवातीला सोने 1020 रुपयांनी स्वस्त झाले. 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. त्यात पुन्हा घसरण आली. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची तर 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि तेवढीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.
सोने - चांदीत चढउतार...
|