बातम्या
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
By nisha patil - 2/23/2024 8:48:02 AM
Share This News:
प्रेशर कुकर नेहमीच वापरात असल्याने काही महिला खुप गांभिर्याने काळजी घेताना दिसत नाहीत. मात्र, यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात स्वयंपाक घरात होऊ शकतात. प्रेशर कुकर नेहमी नियमानुसारच वापरला पाहिजे. कुकर कधीही रस्त्यावरून किंवा चोर बाजारातून घेवू नका. कुकर उतरवल्यानंतर तो उघडण्याची कधीही घाई करू नका, असे छोटे-छोटे नियम पाळले पाहिजेत.
अशी घ्या काळजी
१) प्रेशर कुकर एकदम उघडू नका. शिट्टी काढून उघडा. यामुळे वाफ निघून जाईल. चेहरा दूर ठेवा.
२) कुकर लावताना प्रथम व्हॉल्व, रिंग, आकार हे सर्व तपासा, नंतरच वापरा. कुकर बिघडत असल्यास वेळीच लक्षात येते.३) कुकर वापरल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ करा. झाकण, शिट्टी, रिंग स्वच्छ ठेवा.
४) प्रेशर कुकरचे हॅण्डल ढिले ठेवू नका. कारण गरम कुकर एका जागेवरून अन्यत्र नेताना अपघात घडू शकतो.
५) वरण-भात लावताना खाली थोडं पाणी ठेवा. पाण्याचे प्रमाण कमीही नको. हे प्रमाण चुकले तर प्रेशर कुकरचा व्हॉल्व खराब होतो.
६) प्रेशर कुकर कधीही रस्त्यावरून किंवा चोर बाजारातून घेवू नका. ब्रॅण्डेड कुकर, पावती आणि वॉरण्टी-गॅरण्टीसह खरेदी करा.
७) कुकरच्या रबरी रिंगकडे कायम लक्ष द्या. रिंग खराब झाली असेल तर लगेच बदला. आकार बदललेली रिंग कधीही वापरू नका.
८) कुकरसोबत येणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. त्यातील नियमांचे पालन करा.
९) कुकर किती लिटरचा आहे याचा विचार करूनच अन्न शिजवा. प्रमाणापेक्षा जास्त घटक प्रेशर कुकरमध्ये ठेवणे घातक असते.
१०) कुकर लगेच उघडण्याची घाई करू नका. कुकर खालचा गॅस बंद केल्यानंतर कुकरमधली वाफ व्यवस्थित जिरू द्यावी. आणि नंतरच कुकर उघडावा. खूपच घाई असेल तर प्रथम सर्व वाफ शिटीतून बाहेर जाऊ द्या. नंतर गरम कुकर नळाखाली धरा. यामुळे कुकर थंड होतो.
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
|