बातम्या
मुलांना रात्रीची शांत झोप मिळण्यासाठी ‘या’ 12 गोष्टींचे करा पालन
By nisha patil - 1/3/2024 7:38:49 AM
Share This News:
प्रौढ व्यक्तींना 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. तसेच तीन वर्षांवरील मुलांना 8 ते 10 तासांची झोप हवी असते. ही झोप पूर्ण झाली नाही तर आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. मुलांनी तसेच तरूण आणि प्रौढांनी शांत आणि पूर्ण झोप घेणे खुप गरजेचे आहे. योग्य ती काळजी घेतल्यास पूर्ण झोप मिळू शकते. मुलांच्या झोपेसाठी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेवूयात.
मुलांच्या झोपेसाठी अशी घ्या काळजी
1 मुलांच्या झोपण्याचे व उठण्याचे एक ठरावीक वेळापत्रक असावे. सुटीच्या दिवशीही ते पाळावे.
2 झोपण्याच्या खोलीतील वातावरण शांत असावे.
3 झोप उडवणारे इलेक्ट्रॉनिक खेळ टाळावेत.
4 जेवून लगेच झोपू नये.
5 मुलांना उपाशी झोपवू नये.
6 मुलांना सहज पचतील, थोडीफार भूक भागवणारे पदार्थ द्यावेत.
7 झोपण्यापूर्वी दात घासावेत.
8 झोपताना कोको, कॉफी, चॉकलेट असे उत्तेजक पदार्थ टाळावेत.
9 बेडरूममध्ये प्रखर उजेड नसावा.
10 घरात शांतता राखावी.
11 मुलांना झोपताना भयावह नसलेल्या गोष्टी सांगाव्यात.
12 खोलीत योग्य तापमान असावे.
मुलांना रात्रीची शांत झोप मिळण्यासाठी ‘या’ 12 गोष्टींचे करा पालन
|