बातम्या

डोळ्यांचा अंधुकपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Follow these home remedies to get rid of blurred vision


By nisha patil - 5/1/2024 7:47:31 AM
Share This News:




शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, आपले केस असोत की नखे, प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराच्या कोणत्याही भागात समस्या असल्यास ते आपल्यासाठी त्रासाचे कारण बनते. अनेक वेळा डोळ्यांसमोर अचानक अंधुकपणा येतो, चुकूनही या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अंधुक दिसत असल्यास या टिप्स अवलंबवा.जास्त वेळ लख्ख प्रकाशात काम केल्याने डोळ्यांमध्ये अंधुकपणा येतो. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर तेजस्वी प्रकाशात काम केल्याने किंवा इतर कारणांमुळे असे होऊ शकते, परंतु ही समस्या सतत होत राहिल्यास डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते.  

गुलाब पाणी घाला-
डोळे अंधुक दूर करण्यासाठी गुलाबपाणी वापरता येते. डोळ्यात गुलाब पाण्याचे दोन थेंब टाका. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि अंधुक दिसण्यापासूनही आराम मिळतो.
 
खडी साखर आणि बडीशोप खा-
खडी साखर आणि बडीशोप  सम प्रमाणात मिक्स करून त्याची पावडर बनवा नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास कोमट दुधा सोबत घ्या. काही दिवसांतच आराम मिळेल. 
 
आवळा रस घ्या- 
आवळा आपल्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे, अशा स्थितीत दृष्टी वाढवण्यासाठी आवळा रस पिऊ शकतो. यामुळे डोळ्यांतील अंधुकपणा तर कमी होईलच पण दृष्टीही वाढेल.
 
निरोगी पदार्थचे सेवन करा- 
आहारात व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढवा. शरीरातील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृध्द असलेले निरोगी पदार्थ आणि फळे खा. आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी, आपण दररोज दूध प्यावे.
 
पायाच्या तळव्याला मसाज करा-
अ‍ॅक्युप्रेशर थेरपीमध्ये पायाच्या तळव्यावर मसाज आणि पिन पॉइंट प्रेशर देऊन अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात, त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने अंधुक दिसण्यापासून आराम मिळतो आणि दृष्टीही सुधारते.


डोळ्यांचा अंधुकपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा