बातम्या
दीर्घकाळ अंडी ताजी ठेवण्यासाठी करा 'हे' सोप्पे उपाय
By nisha patil - 10/31/2023 7:26:42 AM
Share This News:
आपला ब्रेकफास्ट हा अंड्यांशिवाय पुर्ण होतच नाही. त्यामुळे आपल्या रोज ताजी अंडी ही लागतातच. तेव्हा आपल्याला फ्रेश अंडी खाण्याची सवय ही असतेच. अंडी ही सदैव फ्रेश राहावीत यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.
अंडी ही 12 ही महिने ताजी राहवीत यासाठी तुम्ही काही ट्रीक्स वापरू शकता. अनेकदा आजारातून आणलेली अंडी ही खराब असण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्याला अशी अंडीही वेळेवर खराब आहेत की नाही हे तपासून पाहणे गरजेचे असते. खराब अंडी खाल्ल्यानं आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. तेव्हा ताजी अंडी खाणं हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते. खराब झालेली अंडी ओळखणंही फार महत्त्वाचं असते. घरच्या घरी बसून तुम्ही ही अंडी खराब आहेत की नाही हेही ओळखू शकतात.
जर का अंड हे पाण्यात टाकताच लगेच बुडाले तर हे अंड ताजं आहे परंतु जर का खराब झालेले अडं असले तर ते पाण्यात तरंगत राहते. जर का थंड पाण्यात अंड टाकल्यावर त्यातून आवाज आला तर समजावे की अंड हे खराब झालेले आहे.
अंडी ताजी राहावीत म्हणून काय करावे?
अंडी जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो. परंतु त्यातही सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे तुम्ही ते रेफ्रिजरेटरच्या मधल्या रॅकमध्ये ठेवू शकता. त्यात तापमान नेहमीसारखे ठेवा. आत ठेवा दरवाज्याच्या रॅकमध्ये ठेवलीत तर ती खराब होऊ शकतात.
मातीच्या भांड्यात अथवा गोणीतही तुम्ही अंडी ठेवू शकता.
तागाच्या गोठीत तुम्ही अंडी ठेवू शकता.
जर तुमच्याकडे तागाची गोणी नसेल तर तुम्ही कोरड्या गवताच्या पॉटमध्येही ही अंडी ठेवू शकता.
तुम्ही बंद रॅकमध्ये ही अंडी ठेवू शकता.
सोबतच तुम्ही मिनरल ऑईलमध्येही ही अंडी ठेवू शकता.
उन्हात अंडी ठेवल्यानंही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.
अंडी खराब होऊ नये म्हणून तुम्ही घरगुती उपाय करू शकता. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा फार जास्त फायदा होईल. खराब अंडी खाणं टाळावीत अन्यथा त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होता. अंडी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. तुम्ही रोज अंडी खावीत. आपल्याला त्यातून अनेक फायदे मिळतात. चिकन खाणंही आपल्या फायद्याचे असते. काही लोकांना फक्त अंड खायला आवडते तर काहींना चिकन जास्त आवडते.
दीर्घकाळ अंडी ताजी ठेवण्यासाठी करा 'हे' सोप्पे उपाय
|