बातम्या
अस्तरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा
By nisha patil - 6/16/2023 4:42:08 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी दूधगंगा डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडण्यासाठी 450 मिलिमीटर व्यासाचे पाईपचे गेट कालव्यावर केले आहे. परंतु या गेट पासून तलावात पाणी येण्याचा मार्ग गाळ व मातीने भरला आहे. या ठिकाणी गेट पासून तलाव पर्यंत पाटबंधारे विभागाच्या कालवा विभागाच्या सहकार्याने ही चर नव्याने खुदाई करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर या चरीचे अस्तरीकरण करण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना श्री घाटगे यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. एक किलोमीटर अंतराच्या या अस्तरीकरणाच्या कामामुळे गेटपासून पाणी तलावात जलद गतीने व पूर्ण क्षमतेने येणार आहे. पाणी पाझणार नाही. त्यामुळे तलाव लवकर भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अस्तरीकरणाच्या प्रस्तावासाठी आपण शासकीय पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही श्री घाटगे यांनी यावेळी दिली.
अस्तरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा
|