बातम्या

राजू दिंडोर्ले यांच्या पाठपुराव्याने काम सुरू

Followup by Raju Dindorle


By nisha patil - 11/3/2024 7:21:25 PM
Share This News:



राजू दिंडोर्ले यांच्या पाठपुराव्याने काम सुरू

जनतेतून कामकाजाबाबत समाधान - राजू दिंडोर्ले

महापालिका कर्मचारी सोसायटीत विकासकामे सुरू

आपटे नगर येथील पाण्याच्या टाकी परिसरातील महापालिका कर्मचारी सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन व जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रारंभ माजी नगरसेवक व मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले यांच्या हस्ते झाला. हे काम 'अमृत' योजनेतून करण्यात येणार आहे. त्यासाठी दिंडोर्ले यांनी महापालिकेकडे
त्यासाठी दिंडोर्ले यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या वेळी महानगरपालिका कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष रणजित पाटील, विठ्ठल मोहिते-पाटील, प्रशांत झेंडे, सागर साळोखे, बाळासाहेब सुतार, प्रवीण पाटील, उमेश हांडे, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. साने गुरुजी वसाहत  आपटे नगर येथील महानगरपालिका कर्मचारी सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन व जलवाहिनी टाकण्याचा
प्रारंभ राजू दिंडोर्ले यांच्या हस्ते झाला. या वेळी रणजित पाटील यांच्यासह मान्यवर व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.


राजू दिंडोर्ले यांच्या पाठपुराव्याने काम सुरू