बातम्या

प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील ग्रुपला सर्वाधिक पसंती

For first year engineering admissions


By nisha patil - 7/26/2023 6:05:09 PM
Share This News:



अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डी. वाय. पाटील ग्रुपच्या तिन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. 

 

कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिक महाविद्यालयाची अलॉटमेंट ९० टक्क्यांपर्यंत  पोहचली असून तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालय ८४ टक्के व साळोखेनगर येथील डी. वाय. पी. अभियांत्रिक महाविद्यालयाची अलॉटमेंट ८०.२४  टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे ९९.१७ पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश पसंती दाखवली आहे.

प्रवेश प्रक्रीयेबाबत अधिक माहिती देताना डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गेल्या चार दशकांपासून डी. वाय. पाटील ग्रुप गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी ओळखला जातो. १९८४ मध्ये कसबा बावडा येथे सुरु झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज ४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तळसंदे व साळोखेनगर येथेही ३ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  आमच्या तिन्ही महाविद्यालयांमध्ये उत्तम शिक्षणाबरोबर सर्वाधिक प्लेसमेंट होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी प्रथम पसंती मिळत आहे.
प्राचार्य डॉ संतोष चेडे म्हणाले,  आमच्या स्वायत्त आभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक ज्ञान यांचा संयोग साधण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. स्कील डेव्हलपमेंटवर भर दिला जात आहे. यावर्षी ६८० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे.

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. येथील ग्रीन कॅम्पसमुळे विद्यार्थ्यांना विशेष उर्जा मिळते. क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही  विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याची पसंती वाढत आहे. 

   साळोखेनगर कॅम्पसचे समन्वयक डॉ. अभिजीत माने म्हणाले, २०१४ साली महाविद्यालयाची सुरुवात झाली. या वर्षी महाविद्यालयातील 223 विद्यार्थी विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवडले. त्यांना 12 लाखापर्यंतचे पॅकेजेस मिळाले कॉम्पुटर सायन्स व डेटा सायन्स बरोबरच सिव्हिल व इलेक्ट्रिकललाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.    
   

प्राचार्य डॉ.सुरेश माने यांनी गत सात वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकावर भर अनुभवाची जोड देऊन व्यक्तिमत्त्व विकाससाठी अभिप्रेत असलेले आधुनिक टेक्निकल शिक्षण देऊन विध्यार्थ्यांना परिपूर्ण केले जाते.
दरम्यान, साळोखेनगर महाविद्यालयात प्रथम प्रवेश घेणाऱ्या निरंजन तोरस्कर या विद्यार्थ्याचे स्वागत डॉ. अभिजीत माने, डॉ.सुरेश माने यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुयोग ताटे- पाटील, ऍडमिशन डीन प्रवीण देसाई, डॉ.संजीव देशपांडे, ऍडमिशन समन्वयक मोनिका शिंदे, शैलजा पन्हाळकर, श्रीकांत भोपळे, योगेश पोवार, वैभव पाटील,रोहित देसाई,रोहित राऊत, गणपती धुमाळ,केदार गायकवाड,सचिन पाटील उपस्थित होते. 
      तिन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पसंती देणारे व प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच आडमिशन विभागातील सदस्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी अभिनंदन केले.


प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील ग्रुपला सर्वाधिक पसंती