बातम्या

नोंदीत बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्राशी संपर्क साधावा

For registration, construction workers should contact the District Labor Facility Center for registration


By nisha patil - 2/16/2024 1:04:45 PM
Share This News:



नोंदीत बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्राशी संपर्क साधावा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांकरीता विविध शैक्षणिक लाभाच्या व आरोग्य विषयक योजना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप आदी योजनांचे वाटप सुरु आहे. तसेच नोंदीत व जिवीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच देण्याचे काम पुढील कालावधीत सुरु होणार आहे.

याबाबत ग्रामीण व शहरी भागामध्ये खासगी इसम वा एजंटांमार्फत कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याबाबत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी होत आहेत. बांधकाम कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण हे 1 रुपयामध्ये होत असून सर्व लाभाचे वाटप विनामूल्य आहे. संबंधित बांधकाम कामगारांनी लाभ मिळवण्यासाठी, नोंदणीसाठी व नुतनीकरणासाठी कोणत्याही खासगी इसमास वा एजंटांशी संपर्क करु नये. नोंदणी, नुतनीकरण व लाभ अर्जाबाबत काही शंका व अडचणी असल्यास जिल्हा कामगार सुविधा केंद्र, किरण शामराव आर्दाळकर बिल्डींग, भाजी मार्केट यार्ड शेजारी, श्री. शाहू मार्केट यार्ड, ई वॉर्ड, कोल्हापूर ४१६००५ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांनी केले आहे.


नोंदीत बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्राशी संपर्क साधावा