विशेष बातम्या

निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो

For the first time Nick Jonas shared a photo of his beloved daughter


By nisha patil - 6/13/2023 7:20:45 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम   बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. कधी ती लाडक्या लेकीसोबत खेळताना दिसते, तर कधी मंदिरात दर्शन घेताना दिसते. पण आता प्रियांकाच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती निक जोनाससोबत  दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राप्रमाणे तिच्या लाडक्या लेकीचा अर्थात मालती मेरीचादेखील  सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आता मालतीचा एक फोटो सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मालती मेरी तिच्या वडिलांसोबत म्हणजेच निक जोनाससोबत दिसत आहे. या फोटोमध्ये निकने मालतीला कडेवर घेतलेलं दिसत आहे. निकने मालतीसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो