बातम्या
राज्याच्या इतिहासात प्रथमच आरोग्य_विषयक_धोरण बनवणार...
By nisha patil - 7/2/2025 7:42:51 PM
Share This News:
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच "आरोग्य_विषयक_धोरण" बनवण्यात येत असून त्या अनुषंगाने आज मुंबईत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याच्या आरोग्य धोरणात महत्वाचा भाग असलेल्या आरोग्य_पर्यटन या विषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात आरोग्य पर्यंटनाला चालना देण्याचा तसेच त्या माध्यमातून रोजगार_निर्मिती व आरोग्य विषयक सुविधांची निर्मिती याबाबत ना.प्रकाश आबिटकरांनी सुचना केल्या.
ना.प्रकाश आबिटकर म्हणाले, भारतात अनेक ठिकाणी परदेशीं नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध देवून, महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. उत्तम सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयाना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आरोग्य पर्यटन विषयाला गती देण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन आंबाडेकर यांचेसह अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या इतिहासात प्रथमच आरोग्य_विषयक_धोरण बनवणार...
|