बातम्या

घनदाट व निरोगी केस हवेत, आत्ताच 'हे' 3 पदार्थ खायला सुरुवात करा

For thicker and healthier hair  start eating these 3 foods now


By nisha patil - 10/13/2023 7:32:05 AM
Share This News:



हवामानातील बदल आणि बिघडलेली जीवनशैली याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हवामानातील बदलामुळं जसे आजार पाठी लागतात त्याचप्रमाणे केस व त्वचेवरही त्याचा परिणाम होत असतो.

आद्रतेमुळं केसात कोंडा होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कोंडा झाल्यामुळं केसात खाज येणे, केस गळणे किंवा केस पातळ होणे अशा समस्या निर्माण होतात. केसांची वाढ होण्यासाठी व केस दाट होण्यासाठी तुमचं डाएटही खूप महत्त्वाचे ठरते.

आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी जसं पोषणाची गरज असते त्याचप्रमाणे केसांची वाढ होण्यासाठी पोषणदेखील आवश्यक असते. बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टमुळं तुम्ही बाहेरून केसांची काळजी घेऊ शकाल मात्र, केसांना पोषण मिळण्यासाठी आहारात काही गोष्टी सामील करणे गरजेचे आहे. घनदाट व लांबसडक केस मिळवण्यासाठी आहारात या तीन गोष्टींचा समावेश करा.

अंड

अंड्यात प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. अंड्याचे सेवन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अंड्यात प्रोटीनव्यतिरिक्त अनेक पोषक तत्वे असतात. जे शरीराव्यतिरिक्त केसांच्या वाढीसाठीही चांगले मानले जातात. तुम्ही अंड्याचा हेअरमास्क बनवूनही लावून वापरु शकता.

अॅव्होकोडा

अॅव्होकोडा हे एक फळासारखेच आहे. अनेकजण नाश्तामध्ये वापरतात. अॅव्होकोडामध्ये व्हिटॅमिन ईचा उत्तम स्त्रोत आढळतो. यामुळं पीएच लेव्हल बॅलेन्स होण्यास मदत व केस निरोगी होतात. नाश्तामध्ये अॅव्होकोडा सामील केल्यास केसदेखील घनदाट आणि मजबूत होतील.

संत्रे

संत्र हे एक असे फळ आहे जे बाराही महिने तुम्हाला बाजारात उपलब्ध होते. संत्र्यात व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत असतो. व्हिटॅमिन सी शरीराला मजबूत बनवते त्याचबरोबर केसदेखील घनदाट होण्यास मदत करते. तुम्ही संत्रे किंवा संत्र्यांचा ज्यूस डाएटमध्ये सामील करु शकतात.


घनदाट व निरोगी केस हवेत, आत्ताच 'हे' 3 पदार्थ खायला सुरुवात करा