बातम्या
वन वनवा सप्ताह जनजागृती वन परिमंडळ तांबाळे येथे उपक्रम संपन्न.
By nisha patil - 10/2/2025 1:52:30 PM
Share This News:
वन वनवा सप्ताह जनजागृती वन परिमंडळ तांबाळे येथे उपक्रम संपन्न.
तारा न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी :विक्रम केजळेकर निसर्ग ही आपली साधन संपत्ती आहे. ही वाचण्यासाठी सर्व वन कर्मचारी प्रयत्नशील असतात. म्हणूनच एक ते सात फेब्रुवारी वन वा सप्ताह जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोंडोशी, तांबाळे, पाळयाचाहुडा , मठगाव ,मानी, सुक्याचीवाडी , चांदमवाडी , बशाचा मोळा, शिवडाव या गावाला वन कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन. लोकांना निसर्गाचं जतन कसं करावं याविषयी माहिती दिली , वनवा रोखा जंगल वाचवा. थोडी दक्षता घेऊया पर्यावरण संवर्धनाला आपला हातभार लावूया.
या संदेशानुसार लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात आली.१ ते ७ फेब्रुवारी वन वनवा सप्ताह हा जनजागृती उपक्रम माननीय श्री जी. गुरुप्रसाद उपवनसंरक्षकसो, कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर व माननीय एन. एस. कांबळे सहाय्यक वनसंरक्षकसो, कोल्हापूर आणि माननीय पल्लवी चव्हाण वनक्षेत्रपाल कडगाव यांचे मार्गदर्शनाखाली किरण पाटील वनपाल तांबाळे वनरक्षक एम. पोवार , जी. कदम, वाय. पाटील, घुगे, रिठे वनसेवक लाड व इतर वन कर्मचारी यांचे समवेत वनपरिक्षेत्र कडगाव मधील वन परिमंडळ तांबाळे कडील गावांमध्ये कार्यक्रम घेऊन वन वनवा लावल्याने होणारे दुष्परिणामा बाबत माहिती सांगून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
वन वनवा सप्ताह जनजागृती वन परिमंडळ तांबाळे येथे उपक्रम संपन्न.
|