बातम्या

माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिह जी यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये श्रद्धांजली अर्पण

Former Prime Minister Late Dr Tribute to Manmohan Singh Ji in Kolhapur

By nisha patil - 3/1/2025 11:07:47 PM
Share This News:

माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिह जी यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये श्रद्धांजली अर्पण

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंह जी यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.

स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंह जी यांनी भारताच्या विकासाबरोबरच लोकशाहीतील सभ्य आणि प्रगल्भ राजकारणाचा आदर्श निर्माण केला. त्यांची साधी राहणी आणि कर्तव्यनिष्ठता सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली.

यावेळी आमदार जयंत आसगांवकर, शिवसेनेचे विजय देवणे यांच्यासह राजेश पाटील- सडोलीकर, राजेश लाटकर, काँग्रेसचे शशांक बावचकर, सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, आपचे संदिप देसाई, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पवार, शेकापचे बाबुराव कदम यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- आमदार सतेज पाटील

माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिह जी यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये श्रद्धांजली अर्पण
Total Views: 28