बातम्या

संन्मती सहकारी पाणीपुरवठा चेअरमनपदी माजी सरपंच प्रकाश पाटील

Former Sarpanch Prakash Patil as Chairman of Sanmati Cooperative Water Supply


By nisha patil - 12/7/2023 6:05:47 PM
Share This News:



कुंभोज वार्ताहर( विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकलंगले येथील संन्मती सहकारी पाणीपुरवठा चेअरमनपदी माजी सरपंच प्रकाश पाटील यांची चेअरमनपदी चैगोड पाटील यांची व्हाईस चेअरमन पदि बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेची बिनविरोधची परंपरा आजही अबाधित राहिली असून प्रकाश पाटील यांनी संस्थेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय असणे त्यांच्या कार्याची दखल म्हणून संस्थेने यावेळी त्यांना बिनविरोध चेअरमन पदाची संधी दिली आहे.
   

यावेळी चेअरमनपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले व सर्व संचालक वर्गाच्या वतीने करण्यात आला यावेळी संस्थेच्या सर्वांनी विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून शासन दरबारी संस्थेच्या विकासासाठी फंड उपलब्ध करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक सचिव व सभासद उपस्थित होते.


संन्मती सहकारी पाणीपुरवठा चेअरमनपदी माजी सरपंच प्रकाश पाटील