बातम्या
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन
By nisha patil - 10/27/2023 7:20:24 PM
Share This News:
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने अख्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं गुरुवारी निधन झालं असून वयाच्या 87 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद ही भूषवलं होतं.त्यांच्या निधनाने अख्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन
|