बातम्या
गोकुळच्या माजी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना दिले योगाचे धडे
By nisha patil - 6/21/2023 5:22:07 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्ताने ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. योगासने ही भारताची प्राचीन परंपरा आहे. मेंदू आणि शरीर यांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. योगा हा संयमी विचाराचे पूर्णत्वाचे दान करणारा आहे. योगाचा अभ्यास हा फक्त व्यायामापूरता नाही तर एकाग्रता आणि चेतना निर्माण करण्यासाठीही आहे. मन,शरीर आणि आत्मा यांना तंदुरूस्त ठेवण्याचे काम योगासने करतात. म्हणूनच योगासने करा, निरोगी रहा.असे प्रतिपादन योग शिबीरा प्रसंगी कर्मचा-यांना स्वतः योगाची प्रात्यक्षिके देताना माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची व प्रात्यक्षिके श्री पाटील यांनी सर्वांगासन,पादान्गुष्टासन, शशिकासन,मंडूकासन,मकरासन,भुजंगासन,धनुरासन,विपरीतनौकासन,पर्वतासन,ताडासन इ. आसने कर्मचा-यांसमोर सादर करुन सदरञची योगासने कर्मचा-यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्यनियमाने सर्व कर्मचा-यांनी करावीत असे आव्हानही त्यांनी केले. तसेच गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं यावेळी. योग विद्येतील विविध योगासनांची माहिती योग प्रशिक्षिका गीतांजली ठोमके यांनी सांगितली.
गोकुळच्या माजी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना दिले योगाचे धडे
|