बातम्या

६ ऑगस्टला कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

Foundation laying of redevelopment of Kolhapur railway station on August 6


By nisha patil - 4/8/2023 5:02:38 PM
Share This News:



केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजना ही देशाची रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी तयार करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे हे त्या सहा ऑगस्टला या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा पायाभरणी सोहळा संपन्न होतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या समारंभात संबोधित करणार आहेत. अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागाचे कमर्शियल मॅनेजर आणि जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस चे पुनर्विकास करण्यात येणार आहे यामध्ये दर्शनी भागाची सुधारणा मोठ्या पोर्चसह बुकिंग काउंटर कव्हर पार्किंग रस्ता रुंदीकरण वेटिंग रूम व्हीआयपी रूम यांचे नूतनीकरण दोन एस्कॅलेटर आणि दोन लिफ्टचं नियोजन करण्यात आले त्याचबरोबर सर्व प्लॅटफॉर्मवर शेड आच्छादन करून सुधारणा करण्यात येणार आहेत वेटिंग रूम प्लॅटफॉर्म इथं आसन व्यवस्था पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वॉटर बूथ सुधारणा केली जाणार आहे. सहा ऑगस्टला होणाऱ्या या कार्यक्रम प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी या समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे यावेळी भिसे यांनी सांगितलं
 


६ ऑगस्टला कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी