बातम्या

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड

Founder Subhash Rao Chavan was elected as the President of Chiplun Urban Cooperative Credit Union and Ashok Sable was elected as the Vice President unopposed


By nisha patil - 7/28/2023 1:32:09 PM
Share This News:



 चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण  तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची घोषणा जागतिक सहकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या सहकार मेळावा प्रसंगी झाली. यानंतर संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण तसेच उपाध्यक्ष अशोक साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. या निवडीनंतर संचालक मंडळ, सभासद व हितचिंतकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे याबद्दल आपण शतशः ऋणी आहोत. संस्थेने आतापर्यंत सर्वसामान्यांचे हीत डोळ्यासमोर वाटचाल केली आहे. त्या पद्धतीनेच भविष्यात काम करून चिपळूण नागरी पतसंस्थेला आणखी प्रगतीपथावर नेऊ, अशी ग्वाही देतांना पुढील पाच वर्षाच्या कालखंडात २ हजार ठेवी पूर्ण होतील, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. 


चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये संचालक पदी संस्थापक सुभाषराव चव्हाण, अशोक साबळे, सूर्यकांत खेतले, अशोक कदम, गुलाब सुर्वे, सत्यवान महामुनकर, सोमा गुडेकर, मनोहर मोहिते, राजेश वाजे, रवींद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, सौ. स्मिता चव्हाण, श्रीमती नीलिमा जगताप, सौ. नयना पवार, राजेंद्र पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. 

यानंतर चिपळूण नागरी आयोजित १०१ व्या जागतिक सहकार दिनानिमित्त आयोजित संस्थेच्या 'सहकार भवन' सभागृहात  सहकार मेळाव्यात संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यानंतर उपस्थितांमधून निवडीचे स्वागत करतांना टाळ्यांचा कडकडाट झाला. 

यावेळी नवनिर्वाचित संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे १ लाख ३८ हजार सभासदांमधून आमची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. तर संचालक मंडळाने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध केली. यामुळे संचालक मंडळ, संस्थेचे सभासद, हितचिंतकांचा शतशः ऋणी आहे, या शब्दांत संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपली भावना व्यक्त केली.  
 तर ते पुढे त्यांनी मागील ३० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतांना संस्थेने वार्षिक व पंचवार्षिक नियोजित आराखडा वेळोवेळी पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. यावेळी देखील  आगामी मार्च २०२४ ( वार्षिक ) आराखडा:-  भागभांडवल ७१ कोटी, निधी ७९ कोटी, स्वनिधी १५० कोटी, ठेवी ११७५ कोटी, कर्ज ९२५ कोटी, ठेवतारण/ सोने कर्ज ४५० कोटी, गुंतवणूक ५२५ कोटी, नफा ४० कोटी तर मार्च २०२८ ( पंचवार्षिक) आराखडा भागभांडवल ९५ कोटी, निधी १७५ कोटी, स्वनिधी २७० कोटी, ठेवी १८५० कोटी, कर्ज १४५५ कोटी, ठेवतारण/सोनेतारण ७६० कोटी, गुंतवणूक ११४५ कोटी, नफा ७० कोटी असा आराखडा निश्चित करण्यात आला असून यामध्ये देखील नक्कीच यश मिळवू, असा विश्वास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

संस्थेने गेल्या ३० वर्षांच्या कालखंडात सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेने वाटचाल केली आहे. याच पद्धतीने ही वाटचाल सुरू ठेवताना चिपळूण नागरी पतसंस्थेला आणखी प्रगतीपथावर नेणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.


जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यावेळी म्हणाले की, शाश्वत विकासासाठी सहकार महत्त्वाचा आहे.  सहकार चळवळीत आर्थिक विकासाची ताकद आहे. आयुष्यात सहकार समजून घेणे गरजेचे आहे. सहकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. युवक- युवती महिलांना सहकारात सामावून घेण्याची वेळ आली आहे. सहकारात आर्थिक साक्षरता व सहकार प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. शाश्वत विकासात ध्यास असला पाहिजे. संकल्प उद्दिष्ट पुर्तीचा नेहमीच आढावा घेतला पाहिजे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने रोजगारात भरीव काम केले आहे, अशा शब्दात कौतुक करताना संस्थेचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, उपाध्यक्ष अशोक साबळे यांच्यासह संचालक मंडळाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील यांनी जागतिक सहकार दिनानिमित्तचा आढावा घेताना चिपळूण नागरी ही 'सहकाराची पंढरी' अशा शब्दात चिपळूण नागरीचे कौतुक करताना नवनिर्वाचित संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण उपाध्यक्ष व संचालक मंडळ अभिनंदन करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

वाशिष्टी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक व उद्योजक प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व उपाध्यक्ष अशोक साबळे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले. जागतिक सहकार दिन व चिपळूण नागरीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची घोषणा हा दुग्ध शर्करा योग आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कोकणात सहकार रुजतोय- वाढतोय, ही बाब आनंदाची आहे.  विशेष म्हणजे संस्थेच्या १ लाख ३८ हजार सभासदांमधून पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध बिनविरोध होते. इतकेच नव्हे तर अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण व उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड होते, हे अभिमानास्पद आहे. ही निवड प्रक्रिया महाराष्ट्रात पतसंस्थेच्या इतिहासात आदर्शवत ठरेल असे आपले मत आहे. संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरीच्या माध्यमातून येथील शेतकरी वर्गाला सहकाराच्या प्रवाहात आणून आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळवून दिला आहे. वाशिष्टी डेअरी अँड मिल्क प्रॉडक्टची उभारणी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली असल्याचे यावेळी यादव यांनी सांगितले. चिपळूण नागरी चे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या कर्मचारी वर्गावर विश्वास दाखवला आहे, तो विश्वास या सर्वांनी सार्थकी ठरवला आहे, अशा शब्दात कर्मचारी वर्गाचे प्रशांत यादव यांनी कौतुक केले.

सेवानिवृत्त शिक्षक विजय सुर्वे यांनी चिपळूण नागरी पतसंस्था उपक्रमशील आहे. सभासदांचा संस्थेवर विश्वास आहे. सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी झटत असल्याचे सांगत नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.


संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने नवनिर्वाचित संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व उपाध्यक्ष अशोक साबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर सुभाषराव चव्हाण यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, उद्योजक प्रशांत यादव, उदय पवार, अरविंद आंब्रे, प्रभाकर जाधव यांच्यासह शेकडो सभासद व हितचिंतक होते. या सर्वांनी संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व उपाध्यक्ष अशोक सावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यावेळी सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.


चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक सुभाषराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची बिनविरोध निवड