बातम्या

हनीट्रॅप प्रकरणी ,कारवाई करत चार आरोपींना अटक

Four accused arrested in honeytrap case


By nisha patil - 1/30/2024 5:26:59 PM
Share This News:



पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरणी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. माहितीनुसार, दोन कॉल गर्ल, पोलीस हवालदार आणि पत्रकाराचा या प्रकरणात समावेश आहे. यातील दुसरी महिला फरार असून इतर चार जणांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या असिस्टंट इंजिनीअरच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली. पत्रकार रवी कांबळे, पोलीस कर्मचारी सुशील गवई, रोहित अहिर आणि दोन कॉल गर्ल्स अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींनी कॉल गर्लच्या माध्यमातून इंजिनीअर तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवू, अशी धमकी दिली होती. यामुळे पीडित तरूणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या चार आरोपींना पकडलं असून एक महिला आरोपी फरार आहे. जिला लवकरच अटक करण्यात येईल.


हनीट्रॅप प्रकरणी ,कारवाई करत चार आरोपींना अटक