बातम्या

पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण करणारे चौघे अटकेत

Four arrested for assaulting police at petrol pump


By nisha patil - 12/20/2023 5:56:16 PM
Share This News:



कोल्हापूरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहा तरुण एका कारमधून कसबा बावडा येथील पोलिस पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल भरल्यानंतर पैशाच्या वादातून त्यांनी साध्या वेशात असलेल्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यासोबत पंपावरील कर्मचाऱ्यालाही मारहाण करून जखमी केले आहे.

पोलिस पेट्रोल पंपावरच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान शाहूपुरी पोलिस ठाण्यात या सहा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
   

  या मारहाणीत पोलिस कॉन्स्टेबल अल्ताफ वाहीद कुरेशी  व पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे जखमी झालेत. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी या अज्ञातांचा शोध घेतला असता दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
    घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , सोमवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी कसबा बावडा येथील पोलिस पेट्रोल पंपावर आली होती. त्यावेळी कॅश व गुगल पेवरून कारमधील तरुणांचा कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद झाला. दरम्यान त्या ठिकाणी ड्युटीवर असणारे पोलिस कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुरेशी यांनाही तसेच निघून जाताना दगडफेक केली. या दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.


पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण करणारे चौघे अटकेत