बातम्या

महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी चौघे ताब्यात

Four arrested in case of pushing Maha distribution employees


By nisha patil - 6/17/2023 2:41:47 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील साईट नंबर 102 मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाठी धक्काबुक्की करून सरकारी कामात  अडथळा निर्माण केल्याप्रकरणी  लक्ष्मण पारसे यांच्यासह त्यांचा मुलगा नारायण पारसे  आणि अन्य दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतल आहे. पारसे  यांच्या भागातील नातेवाईक व मित्रपरिवार यांनी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काढला महावितरण कर्मचाऱ्यांवरील गुन्हा दाखल केला  पाहिजे. अशी मागणी  केली व पोलिसांना जाब विचारला काहीकाळ  वादावादीचा प्रकार  घडला त्यामुळे काही काळ तणावाचे  वातावरण होते .साईट नंबर 102 मध्ये पिण्याचे पाण्याची व बोरच्या पाण्याची अवस्था बिकट आहे शहराला नदी व बोरवेल द्वारे पाणी दिले जाते . वारंवार लाईट जात असल्यामुळे येथील नागरिकांनी महावितरण कडे लेखी तक्रारी केली आहे आज सकाळी महावितरणच्या डीपी बॉक्स मध्ये बिघाड झाल्याचे कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथे  येऊन बिघाड दुरुस्ती केला यावेळी संतप्त नागरिकांनी बबन काटेकर निशिकांत मिरची यांना  धारेवर धरले .त्यातीलच असणारे लक्ष्मण पारसे  शुभम जाधव व अन्य दोघांनी या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली यावेळी माजी नगरसेवक,आरोग्य सभापती संजय केंगार घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांततेचे आवाहन  केले .महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी  लक्ष्मण पारसे यांच्यासह  अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी गावभाग  पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला  यावेळी नागरिक आणि पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.माजी  आरोग्य सभापती संजय केंगार यांना देखील स नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले तारा न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे


महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी चौघे ताब्यात