बातम्या

चार लाख लोकांनी दिली भेट; ८० प्लॅटचे बुकिंग : शेकडो फ्लॅटसबाबत चौकशी

Four lakh people visited Booking of 80 flats


By nisha patil - 2/13/2024 2:13:17 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : क्रिडाईतर्फे आयोजित दालन २०२४ प्रदर्शन हे यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. महासैनिक दरबार लॉनवर ९ ते १२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित या प्रदर्शनाला आतापर्यंत चार लाख लोकांनी भेट देऊन विक्रमी प्रतिसाद दिला आहे.
 

सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. घरांचे विविध पर्याय, गृहकर्ज, कोल्हापूर : क्रिडाई आयोजित दालन प्रदर्शनास झालेली गर्दी. बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान या विषयी माहिती देणारे १६८ स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले होते. प्रदर्शनातील बांधकाम साहित्य छोट्या स्टॉल्समध्ये बेल सिरॅमिक, आणि डी मार्क इंटेरियर्स यांना गौरवण्यात आले.शिर्डी स्टील्स आणि नमो एंटरप्राइजेस यांचा गौरव करण्यात  आला. बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठे स्टॉल्स विभागात देशपांडे इन्फ्रा आणि बेडेकर डेव्हलपर्स यांना पारितोषिक मिळाले. छोट्या
 

स्टॉल्समध्ये निव्या रिअॅलिटी आणिसूर्यवंशी पाटील डेव्हलपर्स यांना बेस्ट स्टॉल पारितोषिक मिळाले.. सांगता समारंभ. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्रा) उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, राजशासनाच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत पार पडला. दालन प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये
घर खरेदीची इच्छा तीव्र असून या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. दालनचे नियोजन एवढे भव्य आणि नेटके होईल याची मी सुरुवातीलाकल्पना केली नव्हती असे के. मंजुलक्ष्मी  यांनी यावेळी बोलताना सांगितले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, अजय डोईजड, दालनचे चेअरमन चेतन वसा, व्हाईस चेअरमन प्रमोद साळुंखे, दालन समन्वयक अतुल पोवार, दालन सचिव गणेश सावंत, दालन खजिनदार श्रीधर कुलकर्णी यांनी दालन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


चार लाख लोकांनी दिली भेट; ८० प्लॅटचे बुकिंग : शेकडो फ्लॅटसबाबत चौकशी