बातम्या

आत्महत्या करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या

Four members of the gang


By nisha patil - 9/20/2023 7:41:47 PM
Share This News:



जर्मनी टोळीतील म्होरक्या आनंदा जाधव उर्फ जर्मनी आणि त्याचा साथीदार अक्षय कोंडुगळे यांनी पोलिस कोठडीत तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना विषारी औषध पुरवून आत्महत्या प्रयत्न करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी  गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस कोठडीतून पाच लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आनंदा जर्मनी आणि अक्षयला विषारी औषध सुमन  आनंदा जाधव उर्फ जर्मनी, साहिल दिलावर अत्तार, आरिफ कादरीआणि प्रथमेश नितीन रणदिवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिक सरदार मुजावर यांचे मागील महिन्यात पाच ऑगस्टला अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. 

या गुन्ह्यातील आरोपी आणि जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंदा जर्मनीने तपासात अडथळा निर्माण व्हावा यासाठी 11 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस कोठडीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिस कोठडीत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल  सुमनसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन जर्मनीने जामिनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळला आहे.

दुसरीकडे, गेल्या महिन्यात सावकार अपहरण, दरोडा प्रकरणातील मुख्य म्होरक्या आनंदा जर्मनी याच्या नावाची दहशत माजवून जर्मनी गँगने हॉटेलवर दरोडा घातला होता. भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेल चालकाला मारहाण करत 7 हजार रुपये काढून घेत पसार झाले होते. या प्रकारानंतर त्याठिकाणीच दारूच्या नशेत पडलेल्या गँगमधील जखमी आरोपीला आयजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा दरोडा त्यांनीच घातल्याचे स्पष्ट झाले होते. बजरंग फातले, शुभम पट्टणकोडे, अमर शिंगे, लोखंडेसह सहा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक उमेश मदन म्हेत्रे यांनी दिली होती.


आत्महत्या करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या