बातम्या

एकाच दिवसात चार जणांचा खून:नागपूरमध्ये खळबळ

Four people killed in a single day


By nisha patil - 7/27/2023 6:14:43 PM
Share This News:



महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरची ऑरेंज सिटी अशी ओळख आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून क्राईम सिटी  अशी ओळख देखील नागपूरने निर्माण केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच मागील 24 तासात म्हणजेच एका दिवसा नागपूर जिल्ह्यात चार हत्या  घडल्या. त्यामुळे क्राईम सिटी ही ओळख अधिक गडद होतेय की काय असं चित्र निर्माण झालं आहे.मागील 24 तासात नागपूर शहरात दोन तर नागपूर ग्रामीण परिसरात दोन हत्या झाल्या. एकाच दिवसात चार हत्याच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरला आहे. पहिल्या घटनेत भावानेच आपल्या मनोरुग्णा बहिणीची हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलाने 40 वर्षीय इसमाची हत्या केली. आणखी एका घटनेत पैशांच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या तिन्ही प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरु आहे.

एका सख्ख्या भावाने मनोरुग्ण बहिणीची हत्या केल्याची घटना नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. मोना उर्फ खुखी किरण चौधरी असं मृत बहिणीचं नाव आहे. तर सुरज उर्फ बाल्या लक्ष्मण रक्षक असं आरोपी भावाचं नाव आहे. नंदनवनमधील पाडोले नगरमधीन हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बहिणीच्या आजारपणाला कंटाळून त्याने तिची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. 

हत्येची दुसरी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोतीबाग परिसरात घडली. इथे अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या शेखर नावाच्या ४० वर्षीय इसमाची हत्या केली. या अल्पवयीन मुलाने संबंधित इसमावर तलवारीने 15 वार करुन त्याला जीवे मारलं. या घटनेप्रकरणी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर नागपूर इथून बेषत्ता दोन जणाची कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिगणाबोडी शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकण्यात आले. हत्या झालेले दोघे व्यापारी असल्याचं समजतं. उधारीच्या पैशांच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्या माहिती समोर आली आहे. नागपुरातील बर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


एकाच दिवसात चार जणांचा खून:नागपूरमध्ये खळबळ