बातम्या
चौघां इसमांना केले कोल्हापूरातून हद्दपार
By nisha patil - 1/4/2024 8:31:56 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचार संहिता लागु झालेली असुन, निवडणुक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणामध्ये पार पाडणे आवश्यक असल्याने, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यानी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची मिटींग घेवुन पोलीस ठाणे हद्दीतील समाजकंटक त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये व्यत्यय निर्माण करणारे, रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांचेवर कठोर प्रतिबंधक कारवाया करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना
दिलेल्या आहेत.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलीस ठाणे स्तरावर गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी करुन लोकसभा निवडणीच्या पर्श्वभुमीवर हद्दपारीची कारवाई करणे आवश्यक असणा-या समाजकंटकांची यादी तयार केलेली आहे. त्याप्रमाणे मुंबई पोलीस अंतर्गत कोल्हापूर जिल्हा हद्दीतुन हद्दपार करणे करीता प्रस्ताव सादर करणेचे काम सुरु आहे. सन २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्हयातुन महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत एकुण ६३ इसमांचे विरुध्द हददपारीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्याअनुषंगाने हद्दपार करणेची प्रक्रिया सुरु आहे. लक्ष्मीपूरी, इचलरकंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन पाठविणेत आलेल्या हद्दपारीचे प्रस्तावापैकी हद्दपारीचे आदेश जारी केलेल्या इसमांची माहिती.
अन हद्दपार इसमाचे नाव, वय
पत्ता
०१ अविनाश अशोक माने वय २९ रा.सोमवारपेठ कोल्हापूर
०२ प्रदिप शिवाजी कांबळे, वय ३२ रा. मलावादे शाळेच्या मागे साईट
| न. १०२ सहकार नगर कोल्हापूर
० ३ | राजेश कृष्णात कुंभार, वय ५१ रा. घर न. ५४४ / १ मधुवन हौसिंग
०४ प्रेम राजु आवळे, वय २३
सोसायी महादेव मंदीर जवळ सोलगे मळा इचलकरंजी रा.भाग्यरेखा टॉकीज समोर सिध्दार्थ होसिंग सोसायटी इचलकरंजी हद्दपारीक्षेत्र व कालावधी कोल्हापूर जिल्हयातुन 1 कोल्हापूर जिल्हयातन ०२ वर्षा करीता हद्दपार प्रस्तावाचे सुनावणीअंती सदरची हद्दपारीची कारवाई ही उप विभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग व उप विभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांनी केलेली असुन, अन्य प्रलंबीत असलेल्या प्रस्तावांची सुनावणीचे काम सुरु आहे.
लवकरच सकारात्मक आदेश पारित होतील. हद्दपारीची कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीमध्ये आढळुन आल्यास, संबधीत पोलीस ठाणेस संपर्क साधुन माहिती देणे बाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरीकांना अवाहन केलेले आहे.
चौघां इसमांना केले कोल्हापूरातून हद्दपार
|