बातम्या
गर्भलिंग निदान करणारे चौघे गजाआड
By nisha patil - 5/18/2024 4:17:48 PM
Share This News:
गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरसह तीन एजंट अशा चौघांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे प्रयाग चिखली येथील एजंटाकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या जप्त केल्या. तर मडिलगे येथील एजंटाकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य पोलिसांनी रात्री जप्त केले.
गारगोटी परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. युवराज गोविंद चव्हाण (वय ३९, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय कृष्णात पाटील (भोई गल्ली, वरणगे पाडळी, ता. करवीर), डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर (गंगा लॉनजवळ, फुलेवाडी रिंगरोड), विजय लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. तर आणखी एक संशयिताचा शोध सुरू असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.
गर्भलिंग निदान करणारे चौघे गजाआड
|