बातम्या

जयसिंगपूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विनामुल्य प्रवेश सुरु

Free admission in government hostel for backward class girls in Jaisingpur


By nisha patil - 5/6/2024 5:07:39 PM
Share This News:



जयसिंगपूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गतील विद्यार्थिनींना इयत्ता 8 वी पासून पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाकरीता प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य वितरीत करण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने मॅन्युअली असून गरजू विद्यार्थिनींनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या वॉर्डननी केली आहे.

 वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ‍िनींना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम, क्रिडा साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जातात. इच्छुक विद्यार्थ‍िनींनी अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जयसिंगपुर ता. शिरोळ, जि. कोल्हापुर येथे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9561148307 वर संपर्क साधावा.

 


जयसिंगपूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विनामुल्य प्रवेश सुरु