बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या 'गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात' मोफत प्रवेश सुरु

Free admission to Government Hostel for meritorious children of Social Justice Department


By nisha patil - 5/31/2024 7:41:15 PM
Share This News:



 दसरा चौक येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावीने गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृहामार्फत समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत वसतीगृह प्रवेश देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये 10 वी, 11 वी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक कोल्हापूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह दसरा चौक कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल एम.एन. जगताप यांनी केले आहे.

 वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सोईसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वतसीगृह, दसरा चौक, सीता कॉलनी कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2547264, भ्रमणध्वनी 8308379099 वर संपर्क साधावा.


सामाजिक न्याय विभागाच्या 'गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात' मोफत प्रवेश सुरु