बातम्या
मिरज येथील शासकीय अपंग बालकगृह व शाळेत मोफत प्रवेश सुरु
By nisha patil - 10/5/2024 4:51:16 PM
Share This News:
सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा परिषद सांगली अंतर्गत शासकीय अपंग बालकगृह व शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी मोफत प्रवेश सुरु झाला असल्याची माहिती शासकीय अपंग बालक गृह व शाळेच्या अधीक्षकांनी दिली आहे.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी पात्रता- वय 6 ते 14 वर्षे (1 ली ते 10 वी), अस्थिव्यंग प्रवर्ग (हाता/पायाने अपंग असलेली बालके) व जिल्हा शल्यचिकित्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज, दूरध्वनी 0233-2222513 व भ्रमणध्वनी-9552097241, 9422216459 वर संपर्क साधावा, असे शासकीय अपंग बालक गृह व शाळेाच्या अधीक्षकांनी कळविले आहे.
मिरज येथील शासकीय अपंग बालकगृह व शाळेत मोफत प्रवेश सुरु
|