बातम्या

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

Free admission to government hostels for backward class girls


By nisha patil - 5/29/2024 9:29:50 PM
Share This News:



 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कोल्हापूर वसतिगृहामार्फत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थिनींची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महावि‌द्यालयामध्ये कोल्हापूर शहर व परिसरामधील प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थिनींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एस.ए. गडकरी यांनी केले आहे.

 वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कोल्हापूर भ्रमणध्वनी क्रमांक 8208225704 वर संपर्क साधावा.


मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु