बातम्या

इंगवले यांच्या वतीने सौंदतीत मोफत आरोग्य सेवा

Free health care in Sundati on behalf of Ingwale


By nisha patil - 12/25/2023 7:13:45 PM
Share This News:



इंगवले यांच्या वतीने सौंदतीत मोफत आरोग्य सेवा
 

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक सौंदती येथील रेणुका देवी,यल्लामा गड येथे जातात त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य विषयी तक्रार असल्यास रविकिरण इंगवले शिवसेना शहर प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून रुग्णांना सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
   

प्रवास करून थकणे,उलट्या, मळमळ, अशक्तपणा, थंड, ताप,खोकला आदी आरोग्य विषयी तक्रारी असतात. त्यांना निस्वार्थीपणे इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली कायमच मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली.इंगवले सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वेळी गरजेनुसार मदतीला धावून जातात. यावेळी सौंदती डोंगरावर अनेकांनी याचा लाभ घेतला असल्याचे  तारा न्युज शी बोलताना सांगितले.
या त्यांच्या कार्याबद्दल भक्तगणांनी समाधान व्यक्त करण्यात आले.


इंगवले यांच्या वतीने सौंदतीत मोफत आरोग्य सेवा